
Fresh clashes erupted on Thursday between protesters from Assam and Arunachal Pradesh along the border in Dhemaji district, prompting police to fire warning shots. The violence came on the second day of…
आसाममधील धेमाजी जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या आंदोलकांमध्ये संघर्ष उफाळला. या हिंसाचारामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. ताकाम मिसिंग पोरिन केबांग संघटनेने पुकारलेल्या बेमुदत आर्थिक नाकेबंदीचा आज दुसरा दिवस होता. या तणावानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सीमावादामुळे परिसरातील परिस्थिती गंभीर बनली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

